२६/०५/२०२०
जिला सासरा गेल्याचं तिळमात्र दुःख नव्हतं ती काय दुःख व्यक्त करणार या प्रसंगात आणि तसं पाहिलं तर जवळपास तीच याला कारणीभूत आहे..मी गेल्या २ दिवसांपासून सांगतोय कि जनावरांच्या वैद्यांना दाखवू आपण तेव्हा पैशांकडे पाहून नको म्हणाली - मग पुन्हा मी जरा बोललो तर "हो" म्हणाली मग पुन्हा दवाखान्याची माहिती घेऊन आलो तर "नको" म्हणाली आणि नंतर डॉक्टरांचा फोन आला तर मला फोन केला डॉक्टरला म्हणून "कुत्रा" बोलली! एवढंच नाही तर मी पुन्हा झापल्यावर मला म्हटली डॉक्टरला जाऊन "पिल्लू मेलं!" असं सांग! मी खूप भयानक चिडलो...
त्यानंतर आज त्या पिल्लूचा त्या हरामखोर बाईने नीट काळजी न घेतल्यामुळे मृत्यू झाला...
त्या पिल्लूचं त्या बाईला एवढं दुःख कि बापाने आणलेल्या आंब्यांचा रस केला! (ती वेगळी गोष्ट कि हि नालायक बाई काल कार्तिकच्या वाढदिवसाला आमरस केला त्याची खुन्नस काढत होती!)
असली दुष्ट बाई हि...
पिल्लू हे घरातल्या मांजराला झालेल्या दोन पिल्लांपैकी एक! पिल्लूची आठवण म्हणजे त्याला आईचे दूध सोडून ताटातील दूध प्यायला जास्त आवडायचं! ते सतत बिनदास घरात सर्व माणसांकडे जायचं आणि बिचाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची तब्येत खूपच खालावली...
त्या दुष्ट बाईकडे सतत दुधाची मागणी करायचं ते पण ती टाळाटाळ करायची - नालायक पैशासाठी माजलेली बाई! माझा दुसरा अंदाज किंवा दुसरं कारण हे सुद्धा असावं कि मांजराचे डोळे उघडत नाही म्हणून मूर्ख बाई सारखं सारखं डोळ्यात माणसांसाठी असणारं डोळ्याचं औषध म्हणजे ड्रॉप टाकायची... हे सुद्धा एक कारण असू शकतं!!
- "कुत्रा"
पिल्लाच्या आत्म्यास शांती लाभो...
दुष्टांना योग्य तो दंड मिळो...
💐🙏🙏💐