२६/२७ जून २०१९ (दौण्ड, माझ्या बेडरूममधून - २६ ला लिहण्याचे ठरविले, २७ मध्यरात्री लिहिण्यास आरंभ)
शेवट हा असा...
शीर्षक अनेक वेळा विचार करून योग्य तो निवडला! शीर्षकात "शेवट" हा शब्द आला आहे. मात्र, हा "शेवट" कसला? कोणाचा?
... वरील प्रश्नांचेच उत्तर या लेखात मिळते! "शेवट"पर्यंत वाचा..
मागील काही वर्षांपासून (खरं तर १८ वर्ष वय पूर्ण करताच) मी नोकरीचा तिरस्कार करू लागलो आणि धंदा किंवा व्यवसाय किंवा व्यापार अशा गोष्टींमध्ये मला अधिक रुची वाटू लागली. पुण्यातलं ते माझं केवळ तिसरच वर्ष होतं! तेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात होतो. प्रथम वर्षाच्या प्रथम सेम (Sem) च्या परीक्षा सुरु झाल्या होत्या. डिसेंबर महिना होता. परीक्षा सुरु असतानाच मी १८ वर्ष पूर्ण केले आणि त्या दरम्यान जे घडले त्याने आयुष्याला एक वेगळेच वळण लागले!
तसं माझ्या आयुष्यात क्षणोक्षणी खूप काही वेगळे अनुभव मिळाले आणि आयुष्याने घेतलेली वळणं पाहायला मिळाली आहे...
म्हणजेच १८ वर्षांचा होण्याच्या आधी किंवा पुण्यात जाण्याच्या आधी अथवा पुण्यात प्रथमच जाताना आलेले अनुभव आणि नंतरचे आज पर्यंतचे अनुभव! खूप वेगळंच आयुष्य जगलोय मी...
असो. तो आयुष्य बदलवणाऱ्या प्रसंगाविषयी बोलणे मी टाळतो कारण खूप लांब कथा आहे ती!
जेव्हा पुण्यातलं ते शिक्षण (११वी पासूनचं) घेत होतो तेव्हा पासून (खरं तर लहानपणापासून) आज पर्यंत मी तणावात जीवन जगत आलोय. या तणाव आणि नैराश्यास केवळ पालकच कारणीभूत आहेत असे म्हणता येणार नाही परंतु टक्केवारीतून अंदाज सांगायचा झाल्यास ९७% पालकच यांस जबाबदार आहेत तर बाकी नैराश्य हे बाहेरील जगातून आणि मानसिक नकारात्मकता तसेच भीती या भावनेतून उत्पन्न होताना दिसते!
अति-अन्नग्रहण
मी आजकाल (खरं तर पुण्याला पाठवलं तेव्हापासून आजपर्यंत) खूप जास्त अन्न ग्रहण करतो आहे. शरीराला लागेल त्यापेक्षा आणि भुकेपेक्षाही जास्त! पुण्यात होतो तेव्हा नैराश्य तर होतेच परंतु बापाच्या अतिकाळजीपणामुळे (म्हणजे फोन करून पोट भरून जेव आणि जास्त जेव अशी धमकीच ते द्यायचे आणि त्यात आपण मेसला पैसे देतोय वैगेरे सुद्धा सांगायचे) या अति अन्नग्रहणाची सवय लागली. नंतर पुण्यातुन दौंडला एकाद्या अप्राध्याप्रमाणे मला जेव्हा आणले आणि नंतरचे काही दिवस जे घडले त्यातून सुटका म्हणून मी आईचा (ताराबाई) आसरा घेतला! तेथे ती मला बळजबरी जास्त खायला लावायची! मला खूप त्रास व्हायचा! तिची समज अशी होती की माझी तब्येत मी पोटभर जेवण करत नसल्यामुळे आहे... मला त्या काळात (म्हणजे आई-बाबा सोबत राहत होतो तेव्हा) खूप शारीरिक त्रास झाला. मानसिक त्रास त्यावेळी खूप नव्हता! आज जे जास्त जेवण करतो त्यांस मम्मी पप्पा जबाबदार आहेत! मूर्ख अशिक्षित कुठले! यांना केवळ चांगला पगार आणि भरपूर संपत्ती आहे - अक्कल मात्र काडीची नाही! बापाला जेव्हा मी या अतिजेवणाचा मला त्रास होतो हे सांगितले तर त्याने "कितीही त्रास झाला तरी खायचं!" असे घाणेरडे वादग्रस्त विधान केले आणि मला धमकावून घाबरवून जबरदस्तीने खायला लावण्याचा प्रयत्न केला. तो मी त्यांच्याच शैलीत (मोठा आवाज करून बोलणे) उलटूनही लावला... नंतर येड्यांनी (दोघांनी) बळेच मला एका आयुर्वेदिक औषध विकणाऱ्या व्यक्तीकडून (मूळचा हा माणूस आंध्र प्रदेशचा) औषध घेतले! (किती हे अज्ञान!) [तसेही या माणसास माझ्यासाठी किंवा माझ्या उपचारासाठी खास बोलावले असे काही नाही! ते वडिलांनी आपल्या बायकोच्या काळजीपोटी (डायबेटीस) बोलावले होते आणि मला समजलं की हे औषध तिने गेले काही महिने घेण्यास सुरु केले आहे ज्याची मला बुलकुल कल्पना नव्हती नेहमीप्रमाणे!] या जास्त जेवणामुळे माझे एकदा अपेंडिक्स ची शस्त्रक्रिया झाली (पुण्यातलं पहिलंच वर्ष) आणि नंतर किरकोळ आजार सुरूच होते परंतु एकदा आईकडे असताना (उकडलेले अंडे रात्रीचे तेही २ खाल्ल्याने) मला प्रचंड त्रास झाला - कावीळ झाल्याचे समजले! बाकी अपचन आणि बद्धकोष्ठता हे आजार आजही सुरूच आहे... कारण ह्या लोकांनी त्रास देणे काही थांबवले नाहीये! अतिजेवणाचे दुसरे एक प्रमुख कारण म्हणजे जेव्हा नैराश्य खूप वाढते तेव्हा ते कोणाला तरी सांगण्याची प्रचंड इच्छा असते पण मला असा कोणी जवळचा मित्र नाहीये मग ते नैराश्य मी अधिक अन्न खाऊन मिटवतो! अतिजेवणाचे प्रमाण माझी "समर बोनान्झा २०१९" ही स्पोकन इंग्लिशची एक मोफत उन्हाळी बॅच संपल्यानंतर खूपच वाढले कारण निदान ते विद्यार्थी येत होते तर मी त्यांच्यात रमून जायचो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारताना, शिकवताना मी नैराश्य विसरून जायचो... पण आज पुन्हा एकटा पडलोय...
अतिउष्णता
उष्णतेचं प्रमाण काही केल्या कमी होईना! मध्यंतरी अनेक वेळा आजारी पडल्यावर वैद्यांस विचारले की ते सांगायचे "उष्णता जास्त आहे. पाणी भरपूर पिणे". केवळ एकच उपाय करून चालत नाही तरी मी दररोज भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करतोच आहे... वेगवेगळे उपाय देखील मी इंटरनेटवर शोधून काढीत असतोच... या अतिउष्णतेचा परिणाम माझ्या शरीरावर होताना मी दररोज पाहत आलोय... घातक आहे...
अतिविचार
इथे "अतिविचार" या संकल्पनेचा अर्थ वेगळा आहे. सामान्यतः अतिविचार म्हणजे एकाच गोष्टीचा जास्त विचार करीत बसणे हा होय! परंतु माझ्या बाबतीत एकाच गोष्टीचा नव्हे तर सतत नवीन नवीन कल्पनांचा विचार माझ्या मनात येत राहतो या अर्थाने मी येथे "अतिविचार" हा शब्द घेतला आहे! कल्पना करणे, विचार करणे कधीच वाईट नसते परंतु जर त्या कल्पनांना आधार नसेल तर त्याचा कचराच बनतो ना - मी कुठे कोणत्या कंपनीचा मालक आहे म्हणजे या सगळ्या कल्पना मला सहज राबवता येतील! पण हे विचार काही केल्या थांबतच नाही... माझ्या या गुणाचा जर आयुष्यात फायदाच नाही झाला मग तो फायदा मानवाला होउदे किंवा संपूर्ण सृष्टीला किंवा एखाद्या क्षेत्राला (Industry) होउदे, तर मग जगणे थांबवलेलेच बरे कि!!!
पिवळे दात
लहानपणापासून मला हा त्रास आहे. मी याच्या काळजीमुळे थोडा अभ्यास केला तर लक्षात आले की हा एक दंतरोग आहे. माझ्या पालकांना माझी काळजी नाही आणि माझ्याकडे पैसे नाही म्हणून यावर इलाज करायचा तरी कसा! (माझ्याकडे पैसे नाही यासाठी पालकच जबाबदार आहेत ती खूप मोठी गोष्ट आहे , अनेक प्रसंग यासाठी पुरावा ठरतात!)
चरबीच्या गाठी
मध्यंतरी माझ्या लक्षात आले की माझ्या शरीरावर चरबीच्या गाठी निर्माण झाल्या आहेत. डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगिले मात्र काळजी करू नका असे म्हणाले! यावर सुद्धा पालक निष्काळजीच!
हृदयरोग
आंधळा होणार मी...
माझे ओठ
तळहाताला त्वचाच शिल्लक नाही...
गुडघे वाजतात!
चेहऱ्यावर फोडी (दाढीच्या भागात!)
घामोळ्याच घामोळ्या!
खराब तब्येत
केसांची समस्या
लैंगिक समस्या - सकाळी चड्डी ओली!
रोगी दैनंदिन जीवनशैली (Unhealthy Routine Lifestyle)
व्यसन कि नैराश्य?
मानसिक आरोग्यास मोठी हानी आणि त्याचा शारीरिक परिणाम...
मला माहित होते तसेच घडत आले... (संकुचित विचार)
"डेथ नोट" - स्लो सुसाईड
...शेवटी या शेवटास जबाबदार कोण?
"माझ्या जागी दुसरा कोणी असता तर जगला नसता..." - मग मी तरी वेगळं काय करतोय?
हा प्रभाव नेमका कोणाचा? कोणी काय करायला हवे होते म्हणजे यश मिळाले असते...