"किंमत" या विषयावरून सध्या प्रबोधनकार वक्ते अर्थात Motivational Speakers एक कथा सांगताना दिसतात ती तुम्ही सुद्धा नक्कीच ऐकली असणार - एक आजोबा असतात. ते नातवाला एक छोटा दगड देतात व सांगतात, "हा दगड घेऊन बाजारात जा. दगडाच्या बदलात काय मिळते हि बघ मात्र तो दगड कोणाला देऊ नको." आजोबांचे ऐकायचे असे ठरवून बाजारात जातो. प्रथम एक भाजी विक्रेता भेटतो. तो म्हणतो, "दगडाच्या बदलात मी तुला 3 किलो बटाटे देईन." पुढे किराणा विक्रेता भेटतो, "15 किलो तांदूळ देईन". असे करत करत वेगवेगळे लोक या छोट्या मुलाला भेटत राहतात व आपल्या परीने किंमत सांगतात. शेवटी तो एका सोनाऱ्याकडे जातो. तेव्हा मात्र सोनार म्हणतो, "या दगडाच्या बदल्यात मी तुला माझा बांगला आणि माझी चारचाकी द्यायला तयार आहे!" आजोबांकडे परत आल्यावर नातू घडलेले सर्व प्रसंग सांगतो आणि प्रश्न विचारतो, "आजोबा, या दगडात असे काय आहे जे प्रत्येक माणसाला दिसले मात्र त्याच्या बदल्यात कोणी कमी तर कोणी जास्त किंमतीच्या वस्तू द्यायला तयार होत होता?" तेव्हा आजोबा हसतात आणि सांगतात, "हा दगड तसा साधासुधा नाही. मात्र या दगडाची किंमत योग्य व्यक्तीकडे गेल्यावरच समजते. जर अज्ञानी किंवा वाईट व्यक्तींकडे किंवा क्षत्रुकडे जर ही वास्तू नेली तर तो तिची योग्य किंमत तुला देणार नाही! तुझी फसवणूक करेल! म्हणून, सोनाराने योग्य किंमत सांगितली तर इतरांनी त्यांच्या पद्धतीने सांगितली! थोडक्यात आपण आपली किंमत जर वाढवायची असेल किंवा टिकवायची असेल तर आपण अशाच लोकांच्या सानिध्यात राहिले पाहिजे जेथे आपल्याला आदर, योग्य मान-सन्मान मिळेल अन्यथा ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांत राहिलो तर आपला विनाकारण अपमान होत राहील व आपल्या गुणकौशल्यांचा उपयोग आपल्याला करता येणार नाही, स्वतःला सिद्ध करता येणार नाही आणि आपले जीवन व्यर्थ जाईल. म्हणून, जीवनात जेथे आपल्याला ज्ञानाला, गुणकौशल्याला योग्य किंमत मिळेल तेथेच आपण जाणे निश्चितपणे योग्य ठरते!"
या कथेमध्ये वेगवेगळे वक्ते परिस्थितीनुसार बदल करतात (कथेतील पात्र आणि प्रसंग बदलतात). मात्र कथा आणि तात्पर्य सारखेच राहते!
कथेत सांगितल्याप्रमाणे जर मी माझ्या वर्तमान आयुष्यात पाहिले तर मला हे प्रकर्षाने जाणवते की आपण आपली किंमत जेथे होत नाही त्या ठिकाणी आपला वेळ व्यर्थ घालवीत आहोत! मग जेथे माझ्या ज्ञानाची किंमत नाही, जेथे मला आदर नाही, मानसन्मान नाही, अशा ठिकाणी किंवा अशा लोकांत राहणे म्हणजे साऱ्या आयुष्याचे डोळ्या देखत वाटोळे होताना बघणे - बाकी काही नाही!
अनेक लोक फसवणूक करून गेले, कोणी अपमान केला, कोणी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, कोणी मला गुंड समजू लागले, कोणी राजकीय नेता समजू लागला, कोणी सामाजिक कार्यकर्ता समजू लागले तर काहींना वाटू लागले हा काहीच करत नाही! (विचारवंत, उद्योजक, शास्त्रज्ञ हे जे काही करतात हे त्यांच्या डोक्यात करतात, हे तुम्हाला मी दाखवणार तरी कसे!)
म्हणून मला जेव्हा या काही दिवसांत कळू लागले की माझ्या बाबतीत एखादा हिरा कचऱ्याच्या ढिगात पडावा तशी गत झाली आहे तेव्हा मी येथून बाहेर पडण्याचा विचार केला आहे... (कारण दुसरा पर्याय उरलेला नाही!) ❤️
~ ARJ Daund 2.2
No comments:
Post a Comment
THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.