July 17, 2019

शाकाहार का स्वीकारावे?

१. तात्पुरते बंद करणार असाल तरी उत्तम आहे कारण आता चातुर्मास सुरु होईल, या चार मासांत शाकाहार अन्नग्रहण केल्यास आरोग्य उत्तम राहते अशी भारतीय संस्कृतीची परंपरा आहे!

२. भगवद्गीतेत भगवान श्री कृष्णाने मनुष्यास सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला आहे!

३. विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा शाकाहारी अन्नच माणसाच्या आरोग्यास अधिक चांगले आहे.

४. शाकाहारी अन्नातून जास्त पोषण मिळते हे सिद्ध झाले आहे.

५. शाकाहारी अन्न खाणारी व्यक्ती ही देवाला प्रिय तर आहेच परंतु राग, द्वेष, नकारात्मक विचारांना दूर ठेऊन माणसाला सत्कर्म करायला लावते.

६. शाकाहार करणारी माणसे अधिक बुद्धिमान असतात तसेच अधिक शक्तिशाली असतात असे सुद्धा सिद्ध झाले आहे.

त्यामुळे शाकाहारी हेच सर्वोच्च अन्न आहे ज्यास सात्विक अन्न असेही बोलले जाते. आणि सात्विक अन्न घेणारी माणसेच देवाला अधिक प्रिय असतात.
त्यात आपण भारत देशात राहतो आणि इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातच सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात. म्हणूनच भारतीय लोक बुद्धिमान आहेत. परंतु विदेशी आक्रमांमुळे काही लोकांनी केवळ चवीसाठी मांसाहार स्वीकारला आहे. सोबत अनेक जणांना व्यसन करण्याची देखील सवय आहे!

योग्य निर्णय घ्या! 😊

No comments:

Post a Comment

THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.