ज्ञानी बना
पौराणिक ग्रंथ सांगतात की ब्राह्मण म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानाचा प्रचार करणारा तर शूद्र म्हणजे अज्ञानी आणि उच्चवर्णीयांची सेवा करणारा. मनुस्मृतीनुसार शूद्रांना ब्राह्मणांनी ज्ञान द्यायचे नाही असा नियम आहे. शूद्राला जरी ज्ञान प्राप्त झाले तरी त्याचं भविष्य अंधारात राहीन असाही नियम त्यात आहे. मनु म्हणजे मानव जातीचा निर्माता.
म्हणून सर्वांना एकच सांगेन अभ्यास करा. ज्ञान घ्या. म्हणजे आपले आपल्या पूर्वज मनुष्यांप्रमाणे हाल होणार नाहीत. ज्ञान घेतले नाही तर छोटे कर्मचारी बनताल. आयुष्य व्यसनात निघून जाईल आणि उच्चवर्णीयांचे ध्येय साध्य होत राहील.
स्वप्न मालक बनण्याची असावीत. पैश्यांच्या हव्यासापोटी कोणाचा गुलाम बनण्याची नसावीत.
👑
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
No comments:
Post a Comment
THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.