२०१९ च्या लोकसभा निवणुकीत अर्थात १७वी लोकसभा स्थापन करण्यासाठीच्या निवणुकीत अनेक नवीन बदल आणि गमतीजमती पाहायला मिळाले आहेत. विशेषकरून २०१४ नंतर ह्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरात फार मोठ्या संख्येने वाढ झालेली दिसून येत आहे. २०१४ नंतर नेते ट्विटर चा वापर करू लागले आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. त्यातच २०१९ मध्ये "चौकीदार" या शब्दाने तर सर्वच भारतीयांना वेड लावले आणि सोशल मीडियावर कोणी #ChowkidarChorHai तर कोणी #ChowkidarPhirSe सारखे हॅशटॅग वापरून आपल्या नेत्याची बाजू घेऊ लागला...
अशातच जसेजसे निवडणुकीचे वारे सुरु झाले तसे तसे महाराष्ट्रातील विरोधकांची चांगलीच दमछाक झाली! अनेक दिग्गज नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करू लागले! त्यात सर्वात जास्त कोंडी झाली ती पवारांची कारण त्यांनी ज्यांना तिकिटे दिली ती कदाचित त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पचनी पडली नाही आणि मग काय? टीका करणे सुरू आणि पक्ष हि बदलणे चालू! देशातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष बनला आहे आज भाजपा.
आता मुख्य विषयाकडे! बारामती मतदारसंघ हा पवार घराण्यासाठी आणि खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो... २०१४ मध्ये हे मोडून काढण्याचा प्रयत्न महादेव जानकर यांनी केला परंतु काही फरकांनी अपयश आले... (माफ करा पण मी माझ्या या लेखात कुठलेच आकडेवारी दिलेले नाहीत आणि कोणताच संदर्भ दिलेला नाही कारण हा लेख केवळ माझे वयक्तिक मत मांडण्यासाठी आहे) २०१९ ला मात्र दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नीने विद्यमान खासदार तसेच लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले...
सौ. कांचन ताई कुल!
कांचन ताईंना बिजेपीतून थेट तिकीट मिळाले...
बीजेपी आणि शिवसेना यांची युती आहे...
शिवसेनेचे आमदार असलेले तालुके सुद्धा बारामती मतदारसंघात आहेत.. आणि आमदारांच्या पत्नी तसेच दौंडचा उमेदवार आणि मोदी लाट असे काही जबरदस्त मुद्दे कांचन ताईंच्या बाजूने!
त्यात जेव्हा आम्हाला समजते कि या मतदारसंघातून तब्बल १८ उमेदवार उभे आहेत तेव्हा आम्हाला खरा प्रश्न हा पडला की लढत या दोन ताईंमध्येच मजबूत होणार आणि लोकांना इतर उमेदवारांची नावे सुद्धा अजून माहिती नाही मग हे उभे राहिलेत तरी कशाला?!
२ ताई सोडल्या तर यातलं बसपा , वंचित बहुजन आघाडी आणि शिवाजी नांदखिले हे काहीसे परिचित आणि यांना काही मते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही...
बसपा च्या उमेदवार बद्दल काहीच माहिती अद्याप मला तरी झालेली नाही आणि तशी चर्चा हि ऐकीवात नाही...
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार नवनाथ पडळकर यांना मी एकदा ऐकले आहे... त्या व्यतिरिक्त या पक्षाचा प्रचार करणारे आणि मत देणारे संख्येने चांगले आहेत कारण हा पक्ष थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश यशवंत आंबेडकर अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांचा आहे!
शिवाजी नांदखिले तर अनेक वर्षांपासून उभे राहतात पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही.. शिवाजीरावांना प्रथम मी ऐकले ते दौण्ड कॉलेजच्या माध्यमातून भरवल्या शिबिरात! (बोरिबेल येथे) तेव्हा मी एकट्यानेच त्यांना प्रश्न केला होता की, "आपल्याला जेल जावं लागलं? का?". संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर मला काही मुले "शेतकरी संघटनेचे नेते" म्हणू लागले होते! असो.
यांच्या व्यतिरिक्त कोणीच तेवढा प्रभावशाली नाही आणि परिचित सुद्धा नाही!
म्हणून मी म्हणत आल्याप्रमाणे ही लढत केवळ जुनी ताई आणि नवीन ताई यांच्यातच आहे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोडले आणि दौंड शहराला सोडले तर ग्रामीण भागात आणि विशेषकरून संपूर्ण बारामती मतदारसंघातील महिलावर्गात जुन्या ताईने चांगलेच स्थान निर्माण केले आहे.
नवीन ताई ला अनुभव नाही अशी सुद्धा मतदारांची भावना आहेच!
मग मोदींच्या नावाने मत मागणाऱ्या ताई बारामती जिंकतात कि केलेल्या कामांच्या आधारे मत मिळवून जुन्या ताई आपला गड राखतात हे पाहणे गरजेचे!
काय झालं?
माझं मत? ते जुन्या ताईला! नवीन ताईला असतं जर त्या कोणत्या घराण्यातून नसत्या आणि थोडा फार अनुभव असता तर! तसा मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही बरं का!
मतदानाचा हक्क १००% बजवा! ऑल दि बेस्ट! :-)
I write only "truth". I am a strict follower of Great Leaders in the World. I write for the World. I want to create a PEACEFUL, HAPPY World!! ---ARJ Daund.
April 21, 2019
२०१९ ला बारामती कोणाची? | ARJ Daund
Labels:
2019,
arj,
arj daund,
arjdaund,
baramti,
daund,
loksabha,
कांचन ताई कुल,
बारामती मतदारसंघ,
राष्ट्रवादी,
राहुल कुल,
सुप्रिया सुळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.