May 4, 2020

थकलोय मी!

आज दिनांक ०४ मे २०२० रोजी (कालपासून पुणे जिल्हा रेड झोन म्हणून घोषित असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे) वडील त्यांच्या "अभ्यंकर" नावाच्या मित्राच्या मैतीला गेले.
त्यांनी हिंदू धर्मानुसार आल्याबरोबर बायकोने आपल्या हाताने पाय धुतल्यावर आणि अंगावर गोमूत्र शिंपडून मग घरात गरम पाण्याने (Neem च्या पानांनी) अंघोळ करायला हवी, परंतु घरात प्रवेश केला, सोफ्यावर बसले, बायकोने नाष्टा दिला आणि त्या माणसाने लगेच तो खाल्ला!
मी जेव्हा आठवण करून दिली तर त्याची बायको माझ्यावरच ओरडायला लागली, डोळे फाडून पाहू लागली - मी निघून गेलो तेथून!
तसं त्या माणसाने किंवा त्या बाईने असे कृत्य प्रथमच केलेत असे नाही, बरेच किस्से आहेत या राक्षसी वृत्तीच्या माणसांचे मग त्यात धाकटा बंधू आणि इतर सदस्य सुद्धा सामील आहेतच - अज्ञानामुळे हे सगळं होत आहे मात्र मला सुद्धा या धर्माचा अपमान करणाऱ्या लोकांचा प्रचंड त्रास होतो - मग असं वाटतं की हे सर्व राक्षसी लोक लवकर मरावेत किंवा मी तरी हे जग सोडून कोठेतरी जायला हवे!
पण हे काही तेवढे सोप्पे नाही - त्यांचा अहंकार ते मेल्यानंतर सोबत घेऊन जातीलच पण जेवढी मदत मी ज्या लोकांना हवी त्यांना करू शकतो तेवढी करता करताच मरेन... शेवटी सेवा करत जीव दिल्याने नुकसान ते काय!
याआधी घरात काही नेहमीचेच डायलॉग मला त्या कुत्रीकडून ऐकविण्यात आले - "माझा तुझा काही संबंध नाही" , वैगेरे - हे सर्व मी नाष्ट्यासाठी तिला मदत करत असताना...
नंतर एका क्षणासाठी मी घरात असलेल्या पण कोणीच ज्याला हात लावत नाही असे एक अमृत पेय म्हणजे Apple Cider Vinegar जे ऋषीने (लहान भाऊ जो मला नेहमीच उलटी उत्तरे देतो - नीट बोलत नाही आणि त्याचे आई वडील नेहमीच त्याचे त्यासाठी समर्थन करतात!) ऑनलाईन मागवलं होतं त्या शुगरच्या पेशंटला (त्या वेडीला!) ते मी काल प्यायलो होतो मग तेव्हा मला ते एकट्यालाच "पिऊन संपवून टाक कारण कोणी पिणार नाही" असे सर्वच घरातील सदस्य बोलले होते, म्हणून मी त्या पॅकवर लिहिलेली माहिती वाचली तर त्यात "तुम्ही अंघोळीच्या बादलीत सुद्धा अर्धा ग्लास टाकू शकता" असे लिहिले होते, मग मी ते त्या गाढविणीला म्हटलो तशी ती जोरातच धावून गेली - "किती महागाचं आहे ते - तुला अक्कल आहे का - मार खाशील अभ्या..." असा रागीट सूर आवळला! मी जेव्हा कालच्या शब्दांची आठवण करून दिली तेव्हा "तुझी लायकी आहे का - तुझा या घराशी काहीच संबंध नाही - मी ते ओतून देईल - फेकून देईल पण तुला देणार नाही" अशी बोलली.

दुपारी ....
देवाची पूजा केली का? असे नेहमीप्रमाणे त्या राक्षसाने विचारले... (ज्याला अजूनही वाटतं की मी देव पूजा केली की संपूर्ण घराचे पाप धुवून निघते मात्र मला कधीच देवपूजा करण्यात रस वाटत नाही कारण ज्या घरातलं वातावरण असं असेल अशा घरात का म्हणून देव वास करतील?)
नंतर मग मंदबुद्धीने मी झोपलेलो त्या खोलीतील लाल प्रकाश देणारा नाईट बल्ब लावला (बिलकुल गरज नसताना) आणि चालू असलेला फॅन अगदी कमी केला... मग भर दुपारी खिडकी का नाही उघडली असे सांगून निघून गेला!
(नालायकाने खूप नको तो खर्च केलाय आजवर - उदा. काही वर्षांपूर्वी पाणी आणि विजेवर चालणारा कुलर काही हजार रुपये खर्च करून घेतलेला आणि एकटाच वापरायचा - या वर्षी अजून त्या मूर्खाला आठवण झालेली दिसत नाही! मग लावेलच तो आवाज!)
सगळी दुपार तणावाखाली झोपूनच काढली...
सायंकाळी उशिराच जाग आली...
उठल्याबरोबर नेहमीप्रमाणे सायंकाळी युट्युब वर २ आवडीची देवाची गाणी ऐकली - गायली आणि अंघोळ करून फ्रेश झालो...

रात्री जेवताना..
(बापाने कढईत काहीतरी केलेला स्वयंपाक मला ताटात न वाढता आणि न त्यातलं काही दाखवता तसाच संपवून टाकला! हिच ती राक्षसी वृत्ती... आणि त्यात नेहमीप्रमाणे बायको आहेच साथ द्यायला... तसा मला फरक पडत नाही कारण मी चवीसाठी जगत नाहीच! पण वृत्ती आणि दुजाभाव किंवा कोणत्या कुटुंबात असे चालतं हेच कळत नाही मला... मी तर अनेक छान कुटुंब पाहिलेत ज्यात बाप आणि आई आपल्या मुलांशी फार प्रेमाने वागतात - त्यांच्यावर विश्वास ठेवतात - त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात - त्यांना कशाची कमी पडू देत नाहीत...)
नाहीतरी मी कुठे कुटुंबात राहतो!
मला आईने (हडळ) सांगितले की केलेले अन्न सर्वांनी मिळून खायचे - पण हे नियम केवळ मीच पाळायचे?
घरातील एकही सदस्य आपल्याशी नीट बोलत नसेल, योग्य वागणूक देत नसेल तर ते कुटुंब आहे असे म्हणावे तरी कसे?
🤔


अन्य घडामोडी...
आज शाळेची कामे फोनवरून विचारून घेतली...
सध्या घेत असलेले ऑनलाईन क्लास घेतले...
सकाळी नाष्ट्यासाठी मदत म्हणून कांदा, टमाटे, कोथिंबीर, इत्यादी चिरले!
आईला (लक्ष्मी जाधव - आजी) दोनदा (सकाळी आणि रात्री) फोन करून तिची चौकशी केली - तब्येत कशी आहे ते विचारले आणि औषध घेतलं का याबाबत सुद्धा विचारणा केली - सध्या तिला याच ४ प्रेमाच्या शब्दांची गरज आहे पण घरातील राक्षसांना काय समजणार!?

No comments:

Post a Comment

THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.