May 5, 2020

कहाणी सव्वा लाख रुपयांच्या संगणकाची!

या महिन्याच्या १७ तारखेला कनिष्ठ बंधू २० वर्षांचे होतील - ते आई-वडिलांचे लाडके आहेत - म्हणूनच तर त्यांनी कसेही वागले तरी त्यांना चालते ...
त्यालाच १-२ वर्षांपूर्वी त्यांनी घेऊन दिला - "सव्वा लाखांचा संगणक" ...
संगणक देण्याबद्दल काही नाही ओह - पण त्याचा वापर कशासाठी होतोय हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरते! तसा PUBG नावाच्या घातक गेम खेळून ते ऑनलाईन स्ट्रीम करणे ज्याला केवळ दर रात्री १ किंवा २ लोक पाहतात - आणि आजवर एकाच व्यक्ती सर्वात जास्त ₹२००/- ची भीक दिली तर काही इतरांनी ₹१५/- ची भीक दिली आणि या माकडाला धंदा कसा करावा हे कळत नाही - तो पंधरा रूपयांसाठी धन्यवाद म्हणून त्याच्या स्ट्रीममध्ये दाखवतो आणि त्याचा माज करतो!
भिकाऱ्यांना सुद्धा दिवसात त्याच्या पेक्षा जास्त कमाई करण्यात सहज यश मिळते!
सव्वा लाख रुपयांच्या या संगणकाचा दुसरा उपयोग जो काही दिवसांपासून होत आहे तो त्याच्या एका प्रकल्पासाठी! ज्याचे नाव त्याने "ARLife" असे दिले आहे - त्याच्याकडे छोटी टीम सुद्धा आहे मात्र सर्वात जास्त काम तो एकटाच करतो! आणि कुठल्या तरी प्रीती नावाच्या गावठी पोरीबद्दल सांगायचं राहीलच! ही मुलगी मला अजूनही ठाऊक नाही मात्र यांनी आपल्या आईस तिचा परिचय करून दिला आणि आई समाधानी आहे.. वाह रे दुनिया!
अनेकदा घरच्यांना आणि त्या आमच्या कंपनीच्या डायरेक्टरला समजावून सांगितले की खरा पैसा ज्यात आहे त्यात लक्ष घाल पण कोण ऐकणार माझे! कारण कोरोनाच्या आणि लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांनी ऑनलाईन वर जोर दिला आहे आणि प्रचंड पैसा कमवत आहेत कारण जागरूक पालक ऑनलाईनसाठी लगेच तयार होतात...
म्हणून केवळ (माहित नाही कसं ते!) कंपनीचा लोगो आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारे प्रमाणपत्र (तेही सुरुवातीला - संगणक नवीन होता - संस्था नुकतीच स्थापली होती तेव्हा) याव्यतिरिक्त या मानवाने सव्वा लाख रुपयांच्या संगणकाचा विशेष फायदा काहीच केलेला दिसत नाही!
अहंकार आणि अज्ञानामुळे तो मार खात आहे - वेळ निघून जात आहे हे सुद्धा यांस समजत नाहीये - कारण त्याचा अहंकार किंवा माज त्याला इतर कोणाचं ऐकू देत नाही आणि थोरल्या भावाला वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य तर दिलेच आहे पालकांनी!
(त्यात अनेक वर्षांपासून फारच बेशिस्त आणि आळशी झाला आहे हे लगेच दिसते - मी जेथे ऑफिस समजून आणि मुलांचा क्लास घेतो त्याच खोलीत हा संगणक असल्यामुळे हि व्यक्ती तेथेच झोपते - खाते/पिते - गेली २ दिवस माझ्या खोलीत नवीन जागा सापडली नाहीतर हॉल मधील सर्व सोफ्याच्या खुर्च्यांवर त्यांचे न धुतलेले कपडे आणि वस्तू पसरलेले असतात... हे सर्व त्याला माफ आहे - अजून - त्याच्या कामाच्या ठिकाणी साफसफाई करण्यास मनाई आहे - तो तर करत नाहीच पण आपण सुद्धा करायची नाही! - खिडक्या उघडण्यास मनाई! - जाळ्या काढण्यास मनाई - माझ्या वाक्यांतून अतिशयोक्ती जाणवेल पण हे सत्य आहे... गेली काही दिवस पाहतोय मी तो दररोज शिंकतो त्या संगणकावर काम करताना - पण पालक आणि तो स्वतः दुर्लक्ष करतो याकडे - मी त्याला अनेकदा या बद्दल बोललो पण अहंकारामुळे त्यास ऐकू आले पाहिजे! त्याचे आरोग्य आणखी धोक्यात आहे कारण पुरेशी झोप घेत नाही तो... बऱ्याचदा रात्रीचे ३ किंवा सव्वा तीन वाजे पर्यंत त्याचे PUBG सुरूच असते...)

No comments:

Post a Comment

THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.